23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयमहात्मा गांधींबद्दल रा. स्व. संघाचे वादग्रस्त वक्तव्य

महात्मा गांधींबद्दल रा. स्व. संघाचे वादग्रस्त वक्तव्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शनिवारी जयपूरमध्ये एका कार्यक्रमात इंद्रेश कुमार म्हणाले की, ७५ वर्षांपूर्वी भारताला फाळणीच्या रूपाने स्वातंत्र्य मिळाले. ते म्हणाले की, त्यावेळी बापू (महात्मा गांधी) नेहरू (जवाहरलाल नेहरू) आणि जिना यांची ब्रिटिशांशी चर्चेसाठी एडीसी म्हणून निवड केली नसती तर भारताची फाळणी झाली नसती.

इंद्रेश कुमार म्हणाले की, जर बापूंनी सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांची एडीसी म्हणून निवड केली असती तर भारताची फाळणी झाली नसती. बापूंच्या छोट्याशा चुकीने भारताचे तुकडे झाले. याआधीही इंद्रेश कुमार आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी हर घर तिरंगा मोहिमेवरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

तत्पूर्वी, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीदेखील आरएसएसवर कडाडून टीका केली होती. कर्नाटक खादी ग्रामोद्योगच्या भेटीची काही छायाचित्रे शेअर करून राहुल गांधी यांनी आरएसएसवर निशाणा साधला होता. आरएसएसने ५२ वर्षांत तिरंगा फडकावला नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. त्यालाही इंद्रेश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले.

इंद्रेश कुमार म्हणाले की, काँग्रेस आणि इतर विरोधी नेते आधी आपल्या माननीय राष्ट्रपतींचा अपमान करतात आणि नंतर हर घर तिरंगा मोहिमेत समील होण्याचे टाळून तिरंग्याचा अपमान करतात. तसेच ते आरएसएसला शिव्या घालणे फॅशन समजतात, असेही कुमार यांनी म्हटले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या