21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयमायक्रो लॅब्स लि. कंपनीवर धाडसत्र

मायक्रो लॅब्स लि. कंपनीवर धाडसत्र

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : डोलो-६५० हे औषध बनविणा-या बंगळुरूतील मायक्रो लॅब्स लिमिटेड कंपनीवर आज आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या २० अधिका-यांच्या टीमने ही छापेमारी केल्याचे सूत्रांनी सांगितले. कर चोरी प्रकरणी ही छापेमारी केली जात असल्याचे समोर आले आहे.

मायक्रो लॅब्स लिमिटेड कंपनीच्या देशभरातील ४० ठिकाणच्या कार्यालयांवर एकाच वेळी छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये दिल्ली, सिक्कीम, पंजाब, तामिळनाडू, गोवा या ठिकाणच्या कार्यालयांचा समावेश आहे. तसेच मायक्रो लॅबचे सीडीएम दिलीप सुरिना आणि डायरेक्टर आनंद सुराना यांच्या घरावरही ही छापेमारी करण्यात आली. बंगळुरूमधील रेस कोर्स रोडवरच्या कार्यालयातील छापेमारीत आयकर विभागाने महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या