22.1 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयमिग २९ गोव्याजवळ क्रॅश

मिग २९ गोव्याजवळ क्रॅश

एकमत ऑनलाईन

पणजी : भारतीय हवाई दलाचे मिग २९ लढाऊ विमान गोवा जवळ कोसळले. दिलासादायक बाब म्हणजे विमान क्रॅश होण्यापूर्वीच पायलटने विमानातून समुद्रात उडी घेतली. त्यामुळे सुदैवाने पायलच सुखरूप आहे. मिग २९ लढाऊ विमानाचा गोवा येथे नियमीत सराव सुरू होता. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पायलटने काही मिनिट सराव केला. त्यानंतर विमान बेसकँम्प कडे माघारी परतताना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. अवघ्या काही सेकंदातच वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटला. त्यानंतर वैमानिकाने विमानातून समुद्रात उडी घेतली. त्यामुळे फायटर जेट गोव्यातील समुद्राजवळ क्रॅश झाले. पायलटने वेळीच विमानातून समुद्रात उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. भारतीय नौदलानं बचावकार्य राबवत वैमानिकाला समुद्रातून सुखरुप बाहेर काढले.

उच्च स्तरीय चौकशीचे आदेश
हवाई दलाने जारी केलेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान अपघातग्रस्त झाले. मात्र का बिघाड नेमका कशामुळे निर्माण झाला, याची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या