22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयमुकेश अंबानींना धमकीचे अफजल गुरू कनेक्शन

मुकेश अंबानींना धमकीचे अफजल गुरू कनेक्शन

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना काल धमकीवजा फोन आला होता. या प्रकरणात धमकी देणा-या आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी विष्णू भोमिक याला दहिसर परिसरातून पोलिसांनी अटक केली. पोलिस तपासात त्याने अफजल नावाने धमकी दिल्याचे समोर आले होते. मात्र चौकशीत विष्णूने घेतलेले नाव हे एक दहशतवाद्याचे होते. हा दहशतवादी म्हणजे अफजलगुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या आधीच दहशतवाद्यांच्या रडारवर भारतातले उद्योगपती आहेत. त्या अनुषंगाने त्यांना सुरक्षाही पुरवली जाते. विष्णूने या अफजल गुरूचे नाव का वापरले, त्याची पार्श्वभूमी पोलिस तपासत आहेत. अँटिलिया प्रकरणानंतर आता अंबानी कुटुंबाला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. यावेळी रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या डिस्प्ले क्रमांकावर धमकीचा फोन आला आहे. कॉलरने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिली, त्यानंतर रुग्णालयातील लोकांनी याबाबत डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. सूत्रांनी सांगितले की, एकूण ८ धमकीचे कॉल आले होते. येत्या तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा करणार असल्याची धमकी काल देण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या