16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयमुलायमसिंह यांच्या दोन सुना आमने- सामने ?

मुलायमसिंह यांच्या दोन सुना आमने- सामने ?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या मैनपुरी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने त्यांच्या सूनबाई डिंपल यादव यांना उमेदवारी दिली. तर त्यांचाच मुलगा प्रतीक यांच्या पत्नी अपर्णा यांना भारतीय जनता पक्ष उमेदवारी देण्याची शक्यता आहे. भाजपने अपर्णा यांना उमेदवारी दिल्यास मैनपुरी मतदारसंघात दोन जावा-जावांमध्ये लढत होणार आहे.

अपर्णा यादव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना वेग आला. अपर्णा यादव यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मात्र त्यांच्यात नेमकी काय खलबते झाली, हे अद्याप कळू शकलेले नाही. मुख्यमंत्री योगी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी प्रदेश भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक होणार आहे. तीत मैनपुरी उमेदवारीचा निणर्य होऊ शकतो. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्यावेळी निवडणूक लढवलेल्या प्रेमसिंग शाक्य यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या