23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयमुळ अशोकस्तंभ शांत-संयमी

मुळ अशोकस्तंभ शांत-संयमी

एकमत ऑनलाईन

मुळ अशोकस्तंभ शांत-संयमी, मोदींनी उभारलेला असुरक्षिततेचे प्रतीक
नवी दिल्ली : देशाच्या नव्या संसद भवनाच्या इमारतीवरील, २० फूट उंच अशा अशोक स्तंभाचे अनावरण सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मात्र, मोदींनी अनावरण केलेल्या अशोक स्तंभावर सातत्याने टीका होत असून त्यात आता तृणमूल काँग्रसचे खासदार जवाहर सरकार यांची भर पडली आहे.

जवाहर सरकार यांनी म्हटले की, देशाचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या भव्य अशोकस्तंभाचा अवमान करण्यात आला आहे. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला असून त्यात आधीचा आणि नवीन अशोकस्तंभ दिसत आहे. ते पुढे म्हणतात की, मूळ डावीकडे आहे, जो की सुंदर, आत्मविश्वासाने उभा आहे. उजवीकडे मोदींनी अनावर केलेल्या अशोकस्तंभ आहे, जो की तिरस्कार, अनावश्यकपणे आक्रमक आणि विषम वाटतो. ट्विटमध्ये सरकार यांनी अशोकस्तंभ तातडीने बदलण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी देखील अशाच प्रकारची टिका केली होती. ते म्हणाले होते की, जुन्या अशोकस्तंभात सिंह गंभीर मुद्रेत आणि जबाबदार शासकासारखा दिसतोय तर, दुस-यामध्ये (संसदेच्या इमारतीवर) तो मनुष्यभक्षी शासकाच्या भूमिकेत भीती पसरवण्यासारखा दिसत आहे. या व्यतिरिक्त काँग्रेसने देखील अशोकस्तंभाच्या अनावरण सोहळ्यांना इतर पक्षांना आमंत्रित न करण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या