21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeराष्ट्रीयराज्यसभेत गोंधळातही गाजला ‘पॉईंट ऑफ ऑर्डर’!

राज्यसभेत गोंधळातही गाजला ‘पॉईंट ऑफ ऑर्डर’!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सुसाट सुटलेल्या ईडीच्या कारवाई विरोधात विरोधी पक्षीय खासदारांची प्रचंड घोषणाबाजी आणि एका विधेयकावर रेटून सुरू असलेली चर्चा हे एकाच वेळी सुरू आहे… आणि त्याच वेळी एका वेगळ्याच विषयावर चर्चेला तोंड फुटले… हा विषय होता, संसदेत मांडला जाणारा व्यवस्थेचा प्रश्न किंवा ‘पॉईंट ऑफ ऑर्डर’…

अर्थात, कामकाज अपेक्षेनुसार चालले नसेल किंवा एखाद्या खासदाराने असंसदीय भाषा वापरली तर अन्य सदस्य असा व्यवस्थेचा प्रश्न नियमांच्या आधारे उपस्थित करतात. राज्यसभेत कामकाज चालू असताना ‘मला व्यवस्थेचा प्रश्न मांडायचा आहे’ असे सांगून कामकाज थांबविण्याचे प्रकार वाढल्याचे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी, याबाबतचे माजी राज्यसभाध्यक्षांचे निर्णय वाचून दाखविले व व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्याच्याही काही पध्दती असतात असे बजावले. गोंधळ, गदारोळ वाढविणारा ‘पॉईंट ऑफ ऑर्डर’ मान्य करता येणार नाही असेही ते म्हणाले.

राज्यघटनेने संसद सदस्यांना संसदेत जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यानुसार (कलम १०५-१) व्यवस्थेचा प्रश्न मांडण्याचाही अधिकार बहाल केला आहे. राज्यांच्या विधीमंडळांमधील ‘औचित्याचा मुद्दा’ हा याच्या जवळपास जाणारा आमदारांचा अधिकार आहे. व्यवस्थेचा प्रश्न कधी मांडावा याचेही काही नियम घटनाकारांनी आखून दिले आहेत.

हरिवंश यांनी यासंदर्भात १९९० व २००६ मध्ये तत्कालीन राज्यसभाध्यक्षांनी दिलेल्या निर्णयांचा आधार घेत त्यांनी वेलमधील कॉँग्रेस व विरोधी पक्षीय खासदारांना दिल्या. ‘पॉईंट ऑफ ऑर्डर’ मांडणे हा सदस्यांचा जन्मसिध्द अधिकार नव्हे. सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू नसेल तेव्हा असे मुद्दे मांडता येणार नाहीत. प्रश्नोत्तर तास किंवा शून्य प्रहरात व्यवस्थेचा प्रश्न मांडला जाऊ शकत नाही. भाजपचे भूपेंद्र यादव यांनी, घटनेने आम्हा सर्वांनाच अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले. पण संसदेत रोजच्या रोज गोंधळ घालण्याचे नव्हे असे सुनावले.

खर्गेंनाही ईडीचे निमंत्रण!
कॉँग्रेसचे मुख्यालय व गांधी मायलेकांच्या घरांभोवती दिल्ली पोलिसांची फौज तसेच यंग इंडियनचे कार्यालय ईडीकडून सील करण्याची कारवाई यामुळे कॉँग्रेस सदस्य सुरवातीपासूनच संतापले होते. त्यात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी, ईडीने संसद चालू असताना आपल्यालाही समन्स पाठवून आज दुपारी साडेबाराला बोलावले आहे, असा गौप्यस्फोट केला. आज सत्तारूढ खासदारच प्रचंड गोंधळ घालत असल्याचे अपवादात्मक दृश््यही राज्यसभेत दिसले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या