22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयराहुल गांधींची पुन्हा चौकशी

राहुल गांधींची पुन्हा चौकशी

एकमत ऑनलाईन

आजही चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. त्यांची आज सुमारे १० तास चौकशी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांना मंगळवारीही चौकशीसाठी ईडीने बोलावले आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली.

राहुल गांधी आज सकाळी ११.०५ वाजता मध्य दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवर असलेल्या ईडीच्या मुख्यालयात पोहोचले. केंद्रीय तपास संस्थेच्या कार्यालयाभोवती पोलिस आणि निमलष्करी दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. तसेच येथे फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. दुपारी साडेतीन वाजता राहुल गांधी ईडी कार्यालयातून जेवणासाठी बाहेर आले आणि सुमारे तासाभरानंतर पुन्हा ईडी कार्यालयात पोहोचले. त्यानंतर पुन्हा चौकशी सुरू झाली.

राहुल गांधी यांची गेल्या आठवड्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सलग ३ दिवस ईडी अधिका-यांनी ३० तासांहून अधिक चौकशी केली होती. ज्यादरम्यान मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचे जबाब नोंदवण्यात आले होते. गेल्या शुक्रवारी ते पुन्हा तपास यंत्रणेसमोर हजर होणार होते. मात्र राहुल गांधी यांनी ईडीच्या तपास अधिका-यांना पत्र लिहून त्यांची आई सोनिया गांधी आजारी असल्याने त्यांना शुक्रवारी होणा-या चौकशीतून सूट देण्याची विनंती केली होती. ईडीने त्यांची विनंती मान्य करून त्यांना २० जूनला हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे आज त्यांची चौकशी करण्यात आली, तर सोनिया गांधी यांना २३ जून रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या