23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयलेह, कटरा, अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के

लेह, कटरा, अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के

एकमत ऑनलाईन

दिबांग : अरुणाचल प्रदेशातील दिबांग खो-यात रविवारी सायंकाळी उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून रिश्टर स्केलमध्ये भूकंपाची तीव्रता ४.४ एवढी नोंदविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे तैवानमध्ये एकीकडे भूकंपाचे १०० हुन अधिक धक्के जाणवल्याची बातमी समोर आल्यानंतर आता अरुणाचल प्रदेशातील दिबांग खो-यात रविवारी सायंकाळी उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे. हे भूकंपाचे धक्के संध्याकाळी ६.२७ च्या सुमारास जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंपाची खोली जमिनीपासून १० किमी खाली होती. भारतातील अनेक भागात नुकतेच भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दोन दिवसांपूर्वी लडाखमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

लेहमध्येही धक्के
लेहमधील अल्चीच्या उत्तरेस १८९ किमी अंतरावर ४.८ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. नुकतेच जम्मू आणि काश्मीरमधील कटरापासून ६२ किमी पूर्व-ईशान्येस ३.५ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ही देशातील भूकंप क्रियाकलापांवर देखरेख ठेवणारी संस्था या घटनांवर लक्ष ठेवून आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या