24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयवाहन कंपन्याना फ्लेक्स इंजिन अनिवार्य

वाहन कंपन्याना फ्लेक्स इंजिन अनिवार्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात इंधनाच्या दरात गेल्या काही दिवसात झालेली वाढ सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावत आहे. दुसरीकडे केंद्र सरकारलाही सुमारे ८ लाख कोटी रुपयांची करावी लागणारी खनिज तेलाची आयात या दोन्ही संकटांच्या कात्रीत सरकार सापडले आहे. त्यावर वाहनांसाठी फ्लेक्स इंजिनाचा वापर करण्याबाबत चर्चा होत होती. मात्र बुधवारी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोनच दिवसात याबाबत अंतिम निर्णय घेणार असून वाहन कंपन्यांना फ्लेक्स इंजिन अनिवार्य करणार असल्याचे म्हटले आहे.

इंधनाचे दर वाढल्याने सामान्य नागरिक त्रस्त आहेत. अशावेळी पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने आणि फ्लेक्स इंधनावर आधारित इंजिनावर भर दिला जात आहे. आता वाहन निर्मिती कंपन्याना फ्लेक्स इंधन इंजिन अनिवार्य करण्यासंबंधी धोरणावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या दोन दिवसात या संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली जाईल, अशी घोषणा केली आहे. फ्लेक्स इंजिनात एकापेक्षा जास्त इंधनाचा वापर करता येऊ शकतो. फ्लेक्स इंजिनमध्ये पेट्रोल किंवा इथेनॉलचा वापर करण्याची सोय केलेली असते. त्यामुळे आपली वाहने या दोन्हीपैकी कोणत्याही इंधनावर चालवता येतील. या निर्णयामुळे जनतेला स्वस्त जैविक इंधनाचा पर्याय मिळणार आहे. तसेच इथेनॉलची निर्मिती शेतमालातून करता येत असल्याने शेतक-यांच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. देशाची खनिज तेलाची आयातही मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

खनिज तेलाच्या आयातीत होणार मोठी घट
सरकार सध्या दरवर्षी ८ लाख कोटींचे खनिज तेल आयात करते. येत्या पाच वर्षात ही आयात २५ लाख कोटींपर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. भारतात पेट्रोलमध्ये ८.५ टक्के इथेनॉलचा वापर होतो. येत्या दोन वर्षात हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत आणण्याचे नियोजन आहे. फ्लेक्स इंजिनमुळे हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवून संपुर्ण खनिज तेल आयात बंद करणेही शक्य होणार आहे, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले. टोयोटा मोटर कॉर्पोरेशन, सुझुकी आणि ुंदाई मोटर इंडियाच्या उच्च अधिका-यांनी याबाबत आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्लीत एका कार्यक्रमात गडकरी यांनी ही घोषणा केली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या