19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयवृंदावन : हॉटेलला आग, २ मृत्यू, १०० जणाांची सुटका

वृंदावन : हॉटेलला आग, २ मृत्यू, १०० जणाांची सुटका

एकमत ऑनलाईन

मथुरा: वृंदावन येथील बसेरा ग्रुपच्या गार्डन हॉटेलला गुरुवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून कोळसा झाला. यात हॉटेलचा आणिखी एक कर्मचारी गंभीर रित्या जखमी झाला आहे. त्याला आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या गोदामात ही आग भडकली. पाहता पाहता तिने तळापर्यंत पेट घेतला.

ज्या हॉटेलमध्ये आग लागली त्या तीन मजली इमारतीत लोकांच्या निवासासाठी २५ खोल्या आहेत. आग भडकली तेव्हा या खोल्यांमध्ये १०० पर्यटक निवासाला आले होते. सुदैवाने त्वरीत त्यांना बाहेर काढल्याने अनर्थ टळला.

गोदामात झोपलेल्या दोघांचा कोळसा
हॉटेलमधील उमेश आणि वीरी सिग हे दोन कर्मचारी गोदामातच झोपले होते. तिथेच आगीचा भडका उडाल्याने या दोघांचा जळून कोळसा झाला. यात आणखी एक कर्मचारी गंभीर रित्या भाजला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या