22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयव्यावसायिक सिलिंडर १०० रुपयांनी महागला

व्यावसायिक सिलिंडर १०० रुपयांनी महागला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला आज झटका बसला आहे. १ डिसेंबरपासून गॅस सिलिंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल, डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र, घरगुती गॅसचे दर जैसे थे ठेवत व्यावसायिक सिलिंडरच्या दरांत १०० रुपये वाढ केली. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर २१०० रुपयांच्या पुढे आहे. दोन महिन्यांपूर्वी तो १७३३ रुपये होता. मुंबईत १९ किलोचा सिलेंडर २०५१ रुपयांना झाला आहे.

त्याचवेळी कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलेंडर २१७४.५० रुपये झाला आहे. आता चेन्नईमध्ये १९ किलोच्या सिलेंडरसाठी २२३४ रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत ८९९.५० रुपये आहे. ६ ऑक्टोबर रोजी त्याची किंमत वाढवण्यात आली, तर मुंबईतही घरगुती सिलिंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. जानेवारीत मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत ६९४ रुपये होती, ती फेब्रुवारीमध्ये ७१९ रुपये प्रतिसिलिंडर करण्यात आली. १५ फेब्रुवारीला त्याची किंमत ७६९ रुपये करण्यात आली.

यानंतर २५ फेब्रुवारीला एलपीजी सिलिंडरची किंमत ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ८१९ रुपये झाली होती. जुलैमध्ये ८३४.५०, तर १८ ऑगस्टला २५ रुपयांनी वाढून ८५९.५० रुपये झाली. यानंतर १ सप्टेंबरला त्यात २५ रुपयांनी वाढ झाली आणि ऑक्टोबरमध्ये १५ रुपयांनी महाग झाला.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या