26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयशशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत; राहुल गांधींना देणार थेट चॅलेंज?

शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत; राहुल गांधींना देणार थेट चॅलेंज?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसने नवा अध्यक्ष निवडण्यासंबंधी विस्तृत कार्यक्रमाची रविवारी घोषणा केली. त्यानुसार २४ सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तर, एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.

पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या ऑनलाइन बैठकीत केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडून सादर झालेल्या निवडणूक कार्यक्रमास मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेस अध्यक्ष कोण होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत त्यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. सूत्रांनी सांगितले की, थरूर यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून ते लवकरच यावर निर्णय घेऊ शकतात.

शशी थरूर या निवडणुकीत सहभागी होणार की नाही यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. थरूर यांनी मल्याळम दैनिक मातृभूमीमध्ये एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचे आवाहन केले.

२०२० मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना संघटनात्मक सुधारणांची मागणी करणारे पत्र लिहिलेल्या २३ नेत्यांच्या गटाचा भाग असलेले थरूर म्हणाले, एआयसीसी आणि पीसीसी प्रतिनिधींकडून या महत्त्वाच्या पदांवर पक्षाचे नेतृत्व कोण करणार हे पक्षाच्या सदस्यांना ठरवू द्यावे, असे ते म्हणाले. नवीन अध्यक्ष निवडणे ही काँग्रेसची नितांत गरज असून पुनरुज्जीवनाच्या दिशेने केवळ ही एक सुरुवात आहे. निवडणुकीसाठी अनेक उमेदवार पुढे येतील, अशी माझी अपेक्षा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या