मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणखी गती मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला सर्व प्रकारची मंजुरी दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये धावणार होती, परंतु महाराष्ट्रात भूसंपादनाच्या संथ गतीमुळे कामाला विलंब होत आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ २० टक्के जमीन संपादित झाली असून, या प्रकल्पासंबंधी सर्व प्रकारच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात हा प्रकल्प वेग धरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अहमदाबाद ते मुंबई असा ५०८ किमीचा बुलेट ट्रेन प्रकल्प प्रस्तावित आहे.
मुंबई-अहमदाबाद या बुलेट लाईनमध्ये एकूण १२ स्थानके असणार असून, यातील ८ स्टेशन गुजरातमध्ये तर ४ स्टेशन महाराष्ट्रात असणार आहेत. साबरमती ते वापी अशी एकूण ३५२ किमीची बुलेट ट्रेन गुजरातमध्ये असेल. या विभागातील ६१ किलोमीटरमध्ये बुलेट ट्रेनचे खांब बसवण्यात आले असून १७० किलोमीटरवर काम सुरू आहे.