ठाणे : सिक्कीममध्ये गेलेल्या ठाण्यातील नागरिकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील चौघांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. ठाण्यातील एकाच कुटुंबातील चार सदस्य फिरण्यासाठी गुरुवारी (२८ मे) विमानाने सिक्कीमला गेले होते. तेथे त्यांनी भाडेतत्वावर एक कार घेतली. ही कार एका दरीत कोसळून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका गंभीर होता की कारमधील पाचही व्यक्तींचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या सर्वांचे मृतदेह ठाण्यात आणले जाणार आहेत.