26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयस्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसला मिळणार मराठी पक्षाध्यक्ष?

स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसला मिळणार मराठी पक्षाध्यक्ष?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर देशभरात काँग्रेस पक्षाची मोठी वाताहत झाली. अनेक नेते काँग्रेस सोडून बाहेर पडले. त्यातच मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. आता काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार असून ऑक्टोबरमध्ये काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. . मात्र काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी नेता विराजमान होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार मुकूल वासनिक यांना मध्य प्रदेश काँग्रेस कमेटीच्या प्रभारी पदावरून मुक्त केले आहे. त्यांच्या जागी जेपी अग्रवाल यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र सोनिया गांधी यांच्या या निर्णयामुळे वासनिक काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. मात्र आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी पक्षातून होत आहे. तर अशोक गेहलोत यांचे देखील नाव चर्चेत आहे. मात्र आता कोणाची वर्णी लागते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र या दोघांनी नकार दिल्यास वासनिक यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. असे झाल्यास, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी चेहरा विराजमान होऊ शकतो.

याआधी पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षविरोधी विधान केल्यामुळे त्यांचे नाव मागे पडल्याचे बोलले जात आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांना अध्यक्ष करण्याची शक्यता धुसर झाली आहे. मात्र नव्या घडामोडींमुळे मुकूल वासनिक यांचे नाव पुढे आले आहे. वासनिक हे तीनवेळा खासदार राहिलेले आहे. तसेच सर्वात कमी वयात संसदेत पोहोचलेले खासदार अशी त्यांची ओळख आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या