22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयहरियाणात एकाच कुटुंबातील ६ जणांची आत्महत्या

हरियाणात एकाच कुटुंबातील ६ जणांची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

अंबाला : एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून ही हत्या की आत्महत्या असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. हरियाणातील अंबाला येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला असून या सर्वांचे मृतदेह राहत्या घरात आढळून आले आहेत. पोलिसांना घटनास्थळावर सुनासाईड नोट आढळून आली आहे. फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी एक सुसाइड नोट सापडली असून त्यात लाखोंच्या व्यवहारांचा उल्लेख आहे.

कुटुंब प्रमुख असलेल्या सुखविंदर सिंग यांनी कुटुंबातील पाच जणांना विषारी द्रव्य देऊन मारले आणि त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. संगत सिंग(६५), त्यांची पत्नी महिंद्रा कौर(६२), त्यांचा मुलगा सुखविंदर सिंग(३२), सुखविंदरची पत्नी प्रमिला (२८) आणि दोन नातवंडे अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अंबाला येथील बलाना गावचे आहे. येथे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला. सुखविंदर सिंग यांचे कुटुंब सकाळी घरातून बाहेर पडले नाही, त्यामुळे त्यांच्या शेजा-यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेजारी सुखविंदर सिंग यांच्या घरी गेले असता सर्व लोक बेशुद्ध अवस्थेत पाहून ते घाबरले. यानंतर शेजा-यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या