23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयहास्य अभिनेते राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर

हास्य अभिनेते राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : हास्य अभिनेते राजू श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक असून ते अजूनही दिल्लीच्या एम्समध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. १० ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करताना त्यांच्या छातीत दुखू लागले होते. त्याचवेळी ते जमिनीवर कोसळले होते. त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

तत्पूर्वी, राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबातील रजत श्रीवास्तव यांनी म्हटले होत की, राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा झालेली दिसून येत आहे. २ दिवसांनंतर ट्यूबच्या सहाय्याने त्यांना दूध दिल्याचेदेखील कुटुंबीयांनी म्हटले होते. कानपूरमध्ये राजू श्रीवास्तव ज्या विभागात राहतात तिथे सगळे लोक त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, म्हणून प्रार्थना करत आहेत, अशीदेखील माहिती रजत श्रीवास्तव यांनी दिली. राजू लवकरात लवकर बरा होऊन कानपूरला यावा, अशी सगळ््यांची मनोकामना असल्याचेदेखील ते म्हणाले.

तत्पूर्वी राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबातील रजत श्रीवास्तव यांनी म्हटले होत की, राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा झालेली दिसून येत आहे. २ दिवसांनंतर ट्यूबच्या सहाय्याने त्यांना दूध दिल्याचेदेखील कुटुंबीयांनी म्हटले होते. कानपूरमध्ये राजू श्रीवास्तव ज्या विभागात राहातात, तिथे सगळे लोक त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, म्हणून प्रार्थना करत आहेत, अशीदेखील माहिती रजत श्रीवास्तव यांनी दिली. राजू लवकरात लवकर बरा होऊन कानपूरला यावा, अशी सगळ््यांची मनोकामना असल्याचेदेखील ते म्हणाले.

बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा यांनीदेखील फोन करुन राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांची विचारपूस केली होती. बीजेपी महामंत्री सुनिल बंसल यांनीदेखील एम्स रुग्णालयात जाऊन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारणा केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या