27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयहेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १४ ठार

हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १४ ठार

एकमत ऑनलाईन

कन्नूर : तामिळनाडूतील कुन्नूर भागातील जंगलात बुधवारी दुपारी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्कराच्या १२ वरिष्ठ अधिका-यांचे निधन झाले. दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरला आग लागली. यात रावत जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

तामिळनाडूतील कुन्नूर येथे आज दुपारी भारतीय हवाईदलाचे एमआय १७ व्ही ५ हे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली असून या घटनेने देश हादरला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये देशाचे संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत, त्यांची पत्नी तसेच अन्य प्रमुख अधिकारी असे एकूण १४ जण होते. दुर्घटनेत रावत हे जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सायंकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.या दुर्घटनेप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत भारतीय हवाई दलाने दुजोरा दिला आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधानांना घटनेबाबत तपशील दिला आहे.

दुर्घटनास्थळी युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. दुर्घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेले तामिळनाडूचे वनमंत्री के. रामचंद्रन यांनी याबाबत माहिती दिली. कुन्नूरपासून ७ किलोमीटर अंतरावर एका खोल दरीत हे हेलिकॉप्टर कोसळले. त्यानंतर आगीचा भडका उडाला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या