नवी दिल्ली : भारतीय सैन्याने आणि हवाई दलाने डीआरडीओसोबत मिळून २४ तासांत हेलिना मिसाईलची दुसरी चाचणी घेतली आहे. पोखरणनंतर लगेचच हिमालयाच्या कुशीत ही चाचणी घेण्यात आली. येथेदेखील हेलिनाने लक्ष्य अचूक भेदले आहे. हिमालयात हे मिसाईल अॅडव्हॉन्स लाईट हेलिकॉप्टरमधून डागण्यात आले होते.
राजस्थानमधील पोखरण येथे अँटी टँक गायडेट मिसाईल हेलिनाने सर्व मानकांची पूर्तता करीत सिम्युलेटेड टँक उद्ध्वस्त केला. २४ तासांत दोन वेगवेगळ््या ठिकाणी अँटी गायडेड मिसाईलच्या चाचण्या घेण्यामागे मोठे कारण आहे. या भागात चिनी आक्रमणाचा धोका आहे. येथून हे मिसाईल कसे काम करते, हा यामागचा हेतू आहे.