नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी हे अंमलबजावणी संचालनालयासमोर १३ जूनला हजर राहणार आहेत.
पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे ते ईडीसमोर हजर होतील, असे काँग्रेसने म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकारांना सांगितले की, कायद्याचे पालन करणारा आमचा पक्ष आहे. आम्ही नियमांचे पालन करतो, असे म्हटले.