नवी दिल्ली : उत्तराखंड आणि नवी दिल्लीत गेल्या वर्षी आयोजित धर्मसंसदेत द्वेषमूलक भाषणे करणा-यांविरोधात पोलिसांनी काय कारवाई केली, अशी विचारणा करीत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तपास संस्थांना स्पष्टिकरण मागितले.
महात्मा गांधी यांचे नातू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. या मुद्द्यावर कुठलीही कारवाई न करणा-या पोलिस अधिका-यांविरोधात अवमानना कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.