19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयबफर स्टॉकमधील ३८ लाख टन डाळ खुल्या बाजारात

बफर स्टॉकमधील ३८ लाख टन डाळ खुल्या बाजारात

एकमत ऑनलाईन

डाळीचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली : महागाईमुळे नागरिकांचे घरखर्चाचे बजेट कोलमडले आहे. एकीकडे खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र डाळींच्या वाढलेल्या किमतींनी पुन्हा त्यांचा खर्च वाढला आहे. मात्र, नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमध्ये ठेवलेली ३८ लाख टन डाळ खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या साठ्यात ३ लाख टन हरभ-याचाही समावेश आहे.

देशात तूर डाळीचे वाढलेले भाव पाहता केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तूर डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यास आणि राज्यातील सर्व व्यापा-यांंनी जमा केलेल्या साठ्याची माहिती सरकारला देण्यास सांगितले. एवढेच नाही तर राज्यांना सध्याच्या तूर साठ्याचा डेटा ग्राहक व्यवहार विभागाच्या ऑनलाइन मॉनिटरिंग पोर्टलवर अपडेट करावा लागेल.

याशिवाय केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ मधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती वाढू नयेत, यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमध्ये ठेवलेली ३८ लाख टन डाळ खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या साठ्यात ३ लाख टन हरभ-याचाही समावेश आहे.

ग्राहक व्यवहार विभागाच्या म्हणण्यानुसार देशात तूर डाळीच्या उत्पादनात यंदा घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे तूर डाळीचे भाव वाढत आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. खरे तर या राज्यांमध्ये खराब हवामानामुळे खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. त्यामुळे जुलैच्या दुस-या आठवड्यापासून तूर दरात वाढ होत आहे.

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी ४७ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा केवळ ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर तूर पेरणी झाली. तूर लागवड क्षेत्रात मागील हंगामाच्या तुलनेत ११ टक्क्यांनी घट झाली आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या प्राइस मॉनिटरिंग सेलनुसार गेल्या २ महिन्यांपासून तूर डाळीची किरकोळ किंमत १०० रुपये प्रतिकिलोच्या आसपास होती. परंतु शुक्रवारी डाळीचे भाव १११ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या