हैदराबाद : हैदराबाद बलात्कार प्रकरणी एमआयएम आमदाराच्या मुलाला आणि पुतण्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली. दोघेही अल्पवयीन आहेत. ज्या इनोव्हा कारमध्ये हा गुन्हा घडला ती सरकारी कार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
हैदराबादचे पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांनी सांगितले की, ही कार एका आरोपीच्या वडिलांना देण्यात आली होती. आरोपीचे वडील प्रतिष्ठित नेते असून ते एका सरकारी संस्थेचे प्रमुख आहेत. यात आतापर्यंत ५ जणांना अटक केली.