25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयबिहार : ‘एमआयएम’चे चार आमदार फुटले

बिहार : ‘एमआयएम’चे चार आमदार फुटले

एकमत ऑनलाईन

बिहार : महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. येथे एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना मोठा झटका बसला आहे.

एमआयएमच्या चार आमदारांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान वगळता इतर चार आमदारांनी पक्ष सोडला आहे. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह सर्व आमदार विधानसभा अध्यक्षांकडे पोहोचले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत ओवैसींच्या ‘एमआयएम’चे पाच आमदार विजयी होऊन विधानसभेत पोहोचले होते. यातील चार आमदारांनी आता पक्ष सोडला आहे. यामध्ये शाहनवाज, मोहम्मद अंजार नईमी, मोहम्मद इझार असफी आणि सय्यद रुकनुद्दीन यांच्या नावांचा समावेश आहे.

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसींच्या पक्षातून चार आमदार आल्यानंतर बिहार विधानसभेत आरजेडी हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. पक्षाकडे आता एकूण ८० आमदार आहेत. भाजप दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांच्या आमदारांची संख्या ७८ आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या