नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाइ)ची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे. देशाच्या टोल टॅक्सचे उत्पन्न सध्या वार्षिक ३४ हजार कोटी रुपये आहे. २०२५ पर्यंत टोलमधून मिळणारी कमाई वार्षिक १.३४ लाख कोटी रुपये होईल असा विश्वास केंद्रीय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे लीडरशिप समिट २०२१ च्या १४ व्या इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया अवॉर्ड्स मध्ये गडकरी बोलत होते. चार्टर्ड अकाउंटंट्स हे आपल्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहेत.
सध्या न्हाइची आर्थिक स्थिती खरोखरच चांगली स्थितीत आहे. सध्याच्या टोल टॅक्समधून मिळणारे उत्पन्न वर्षाकाठी ३४ हजार कोटी रुपये आहे आणि २०२५ पर्यंत आपले वार्षिक उत्पन्न १.३४ लाख कोटी असेल.भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. वित्तपुरवठ्यासाठी आता देशाला विविध प्रकारचे नवे प्रयोग करण्याची गरज आहे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
विकासासाठी अधिक परकीय गुंतवणूकीची गरज
आपली एकूण यंत्रणा डिजिटल आहे. आपल्याला देशाच्या विकासासाठी परकीय गुंतवणूकीची गरज आहे. धोरणनिर्मितीसाठी वेगवेगळया प्रकारचे उपक्रम विकसित केले जाणे आवश्यक आहे, ज्याद्वारे आपल्याला देशात अधिक थेट परकीय गुंतवणूक मिळू शकेल. सामाजिक-आर्थिक बदल आणि दारिद्र निर्मूलन ही मोठी आव्हाने आहेत, परंतु नवे फंडिंग मॉडेल, नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन कौशल्यांनी ज्ञानाचे संपत्तीमध्ये रुपांतर करणे शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधींनी नकार दिला तर गेहलोत होणार काँग्रेस अध्यक्ष?