24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयअर्पितासाठी दीड कोटींचा प्रीमियम

अर्पितासाठी दीड कोटींचा प्रीमियम

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीच्या अटकेत असणारे माजी शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी यांच्याविरोधात ५८ दिवसांनी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. ही चार्जशीट सोमवारी बँकशाल कोर्टात सादर करण्यात आली आहे. या दोषारोप पत्रामद्धे काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय असणा-या अर्पिता मुखर्जी यांच्या ३१ एलआयसी पॉलिसींचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

या पॉलिसीच्या प्रीमियमसाठी पार्थ चटर्जी वर्षाला दीड कोटी रुपये भरत होते, असा आरोप ईडीने केला आहे. या ३१ पैकी बहुतांश पॉलिसींचे प्रीमियम ५० हजार आहे. तर काही पॉलिसी ४५ हजार रुपये आहेत. पार्थ चटर्जी यांच्या मोबाइल फोनच्या तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे. ईडीने केलेल्या दाव्यानुसार, बँकेच्या कागदपत्रावरून पॉलिसीच्या प्रीमियमची माहिती मिळाली आहे. अर्पिता मुखर्जींच्या ३१ प्रीमियमसाठी पार्थ चटर्जी बँकेत पैसे जमा करत होते. या माहितीच्या आधारे, ईडीने कोर्टात दावा केला आहे की, बँकेत एकूण दीड कोटी रुपये जमा होते. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने ही माहिती दिली असल्याचे ईडीने सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या