23.3 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयस्पुटनिक व्ही लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल

स्पुटनिक व्ही लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. १ मे पासून देशात १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत होता. मात्र आता रशियाच्या स्फुटनिक व्ही या लसीचेही डोस भारतात दाखल झाले आहेत. स्पुटनिक व्ही लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल झाल्याची माहिती केंद्रिय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

स्फुटनिक व्ही लसीच्या उपलब्धतेबाबत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी लिहिलेल्या पत्राला ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. ठाकूर यांच्या पत्रामुळे देशाला आता कोरोना प्रतिबंधक तिसरी लस प्रत्यक्ष हातात प्राप्त झाली आहे. आता यांच्या आणखी खेपा येणार असल्याने लसीकरणाला गती मिळण्याची शक्यता आहे. स्पुटनिक व्ही लसीची परिणामकारकता ९२ टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे.

११४ दिवसांत १७ कोटी नागरिकांचे लसीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या