34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeराष्ट्रीयदिवसभरात १ लाख १५ हजार ३१२ नवे रुग्ण आढळले

दिवसभरात १ लाख १५ हजार ३१२ नवे रुग्ण आढळले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा संसर्ग खूप वेगाने होत आहे. गेल्या २४ तासात देशात १ लाख १५ हजारांपेक्षा जास्त नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. एक लाखांच्या वर रुग्णसंख्या एका दिवसात आढळण्याची ही गेल्या ३ दिवसांतील दुसरी वेळ आहे. करोना संक्रमणकाळात ही दुसरी वेळ आहे जेव्हा करोना संक्रमितांची एका दिवसाच्या संख्येनं एक लाखांचा टप्पा ओलांडलाय.

याअगोदर रविवारी (सोमवारी सकाळी जाहीर झालेली आकडेवारी) कोरोना संक्रमित १ लाख ०३ हजार ५५८ रुग्ण आढळले होते. त्यामुळे, आज जाहीर झालेली संख्या ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या ठरली आहे. त्यातच आणखी चिंतेची बाब म्हणजे दुस-या लाटेत गर्भवती महिला व लहान मुलांना कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंता वाढवणारी बाब आहे.

सध्या देशात कोरोना संक्रमणाचे तब्बल १ कोटी १७ लाख ९९ हजार ७४६ रुग्ण झाले आहेत. सक्रीय रुग्णांचा आकडा ८ लाख ४३ हजार ७७९ एवढा आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत आता चौथा सर्वात मोठा देश ठरलाय. गेल्या २४ तासांत ६३१ जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी कोरोना संक्रमणामुळे मृत्युमुखी पडणा-यांची संख्या १ लाख ६६ हजार २०८ वर पोहचली आहे.

महाराष्ट्र (३१ लाख १३ हजार ३५४), केरळ (११ लाख ३७ हजार ५९०), कर्नाटक (१० लाख २० हजार ४३४), आंध्र प्रदेश (९ लाख ०९ हजार ००२) आणि तामिळनाडू (९ लाख ०३ हजार ४७९) हे सर्वाधिक प्रभावित राज्य ठरले आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या
१ एप्रिल : ८१ हजार ३९८
२ एप्रिल : ८९ हजार ०२३
३ एप्रिल : ९२ हजार ९९४
४ एप्रिल : १ लाख ०३ हजार ४९४
५ एप्रिल : ९६ हजार ५६३
६ एप्रिल : १ लाख १५ हजार ३१२

महाराष्ट्रातही चिमुकल्यांचे झाले होते मृत्यू
दिल्लीत पहिल्या लाटेत आढळलेल्या रुग्णांमध्ये वयोवृद्ध रुग्णांची संख्या अधिक होती. परंतु आता मात्र लहान मुले, तरुण आणि गर्भवती महिला यांची संख्या अधिक आढळत आहे, असे दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी एका मीडियाशी बोलताना सांगितले आहे. महाराष्ट्रातही काही प्रमाणात असेच काहीसे चित्र असून औरंगाबादमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याचे व मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे.

कारमध्ये एकटे असलात तरीही मास्क बंधनकारक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या