28.2 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी

कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतक-यांना स्वस्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधीला सुरुवात केली आहे. मोदी यांनी रविवारी सकाळी ११ वाजता व्हीडीओ क्वान्फरन्सिंगद्वारे ही योजना सुरू केली. या माध्यमातून वेअर हाऊस, कोल्ड स्टोरेज, फूड प्रोसेसिंगशी संबंधित लघु उद्योगाला प्रोत्साहन मिळणार आहे. या बरोबरच कृषी पायाभूत सुविधा फंडांतर्गत ८.५ कोटींहून अधिक शेतक-यांना १७ हजार कोटी रुपये वितरित केल्याचे सांगितले.

लॉकडाऊनच्या स्थितीत जुलै महिन्यात सरकारने कृषी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी सवलतीच्या ळपान ५ वर
दरात कर्जासाठी १ लाख कोटींच्या निधीसह अ‍ॅग्री-इन्फ्रा फंडाच्या स्थापनेस मान्यता दिली होती. पंतप्रधानांनी या योजनेची आज सुरुवात केली. या अगोदर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्पादित पिकांशी संबंधित पायाभूत सुविधा आणि पिकांच्या साठवणुकीशी संबंधित सुविधा सुधारण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या वित्त पुरवठ्याची घोषणा केली होती. कृषी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, कंपन्या आणि स्टार्ट अप्स यांना यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यातून कोल्ड चेन, आधुनिक साठवण सुविधा, शेतातून पिकाला केंद्राकडे नेण्यासाठी वाहतुकीची उत्तम सोय या योजना उपलब्ध करून देता येणार आहेत.

वर्षांत वितरित करणार कर्ज
हे कर्ज चार वर्षात वितरित केले जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात १० हजार कोटी आणि पुढील तीन आर्थिक वर्षात प्रत्येकी ३० हजार कोटी रुपये वितरित केले जातील. या सुविधेअंतर्गत सर्व प्रकारच्या कर्जात २ कोटी रुपयांच्या कर्जाच्या व्याजावर ३ टक्के सूट दिली जाणार आहे. ही सूट जास्तीत जास्त ७ वर्षांसाठी असेल.

शेतकरी सन्मान निधी बँक खात्यात वर्ग
ळदेशातील ८.५ कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या रुपात १७ हजार कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या दीड वर्षात या योजनेअंतर्गत ७५ हजार कोटी रुपये थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत, असे मोदी म्हणाले. यांपैकी २२ कोटी रुपये कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाल्यानंतर शेतक-यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत,असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

वेअर हाऊस, कोल्ड स्टोरेज उभारणीसाठी मिळणार कर्ज
या माध्यमातून गावांमधील शेतकरी समूहांना, शेतकरी समित्या, एफपीओंना वेअर हाऊस बनवण्यासाठी, तसेच कोल्ड स्टोरेज तयार करण्यासाठी आणि फूड प्रोसेसिंगशी संबंधित लघु उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज मिळणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. ई-नामद्वारे एक तंत्रज्ञान आधारित एक मोठी व्यवस्था बनवण्यात आली आहे. आता कायदा तयार करून शेतक-यांना बाजाराच्या तसेच बाजार कराच्या कक्षेतून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे ई-नामच्या माध्यमातून शेतक-यांना थेट उत्पादन विकता येणार आहे, असेही ते म्हणाले.

१०१ संरक्षण उपकरणाच्या आयातीवर मंत्रालयाची बंदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या