34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeराष्ट्रीयभारतीय सैन्यातून होणार १ लाख सैनिकांची कपात

भारतीय सैन्यातून होणार १ लाख सैनिकांची कपात

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय सैन्य स्वत: ला अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याची तयारी करत आहे. भारतीय सैन्यात पुढील काही वर्षांत एक लाख सैनिकांची कपात केली जाईल. त्यातून होणाºया बचतीचा उपयोग सैन्याला नवीन तंत्रज्ञान देण्यासाठी केला जाईल. सध्या भारतीय सैन्यात सुमारे १४ लाख सैनिक आहेत. चीनी सैनिकांची संख्या पाहता ही कमी आहे. थेट सैनिकी कारवाईत सहभाग न घेता जे सर्व्हिस किंवा मेकॅनिक काम करतात अशांची संख्या कमी केली जाईल. जनरल बिपीन रावत यांनी यासंदर्भात माहिती दिली.

यासह बाहेरील भागात तैनात सैनिकांना चांगली शस्त्रे आणि नवीन उपकरणे मिळतील. संरक्षणविषयक संसदीय समितीने गेल्या महिन्यातच आपला अहवाल सभागृहात सादर केला. या अहवालात, चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी नमूद केले आहे की, त्यांच्या मते, आता सैन्याला तंत्रज्ञानाकडे अधिकाधिक लक्ष द्यावे आणि युद्धाच्या नव्या मार्गासाठी स्वत: ला तयार करायचे आहे.

पूर्वी सैन्य दुर्गम भागात तैनात केले जायचे, मग त्यासाठी स्वत:च्या सर्व व्यवस्था करावी लागत असे. पण आता चांगल्या पायाभूत सुविधांमुळे आता त्याची गरज भासत नाही. पूर्वीप्रमाणे सैन्यात बेस दुरुस्ती डेपो होते, ज्यात वाहने दुरुस्त केली जात होती. पण आता ते आउटसोर्स केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, टाटा कंपनीकडे कार असल्यास ती टाटाच्या कार्यशाळेत दुरुस्तीसाठी पाठविली जाऊ शकते. याद्वारे जी बचत होईल, सैन्य युद्धाच्या नव्या पद्धतींसाठी आवश्यक असणारी जागा, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या नवीन तंत्रज्ञानावर खर्च करता येईल.

जनरल रावत यांनी समितीला सांगितले, अशा प्रकारे आम्ही येत्या काही वर्षांत सैनिक संख्या एक लाखांनी कमी करू. या बचतीचा उपयोग नवीन तंत्रज्ञानामध्ये करू. आपले लक्ष बाहेरील भागात पदस्थापित सैन्यदलाच्या सैनिकांवर असेल. आपल्या सैनिकांना आधुनिक रायफल द्यायची आहे. नवी उपकरणे आणि तंत्रज्ञान द्यायचे आहे असे ते म्हणाले.

देशमुख पाठोपाठ राज्य सरकारही सर्वोच्च न्यायालयात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या