28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयदोन मुख्य आरोपींना १० दिवसांची न्यायालयीन कोठडी

दोन मुख्य आरोपींना १० दिवसांची न्यायालयीन कोठडी

एकमत ऑनलाईन

पणजी : भाजप नेत्या आणि बिग बॉस फेम सोनाली फोगट हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गोव्यातील मापुसा न्यायालयाने आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंहला १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, सोनाली फोगट यांचा पीए राहिलेला सुधीर सांगवानने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. यामध्ये सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंह, संशयित ड्रग्ज तस्कर दत्त प्रसाद गावकर आणि कर्लीज रेस्टॉरंटचे मालक एडविन न्यून्स यांचा समावेश आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री आरोपी दत्त प्रसाद गावकर आणि आज एडविन न्यून्सला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान कर्लीज रेस्टॉरंटच्या टॉयलेटरीमध्ये सिंथेटिक ड्रग आढळून आले. सोनाली फोगटने प्रसाधन सामग्री वापरली. यानंतर रेस्टॉरंटचा मालक एडविन न्यून्स याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स (एनडीपीएस) अधिनियम, १९८५ अंतर्गत नवीन एफआयआर नोंदवला आहे. ज्यामध्ये सुधीर सांगवान, सुखविंदर सिंह, दत्त गावकर आणि कर्ली रेस्टॉरंटचे मालक यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या