श्रीनगर :जम्मू-काश्मीर खोऱ्यात गेल्या पाच दिवसात सुरक्षादलांनी १० दहशतवाद्यांना कंठस्रान घातले आहे तसेच एक दहशतवादी शरण आल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली आहे. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही काही दिवसांत दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या.
सुरक्षादलांनीही अतिरक्यांना वठणाीवरआणण्यासाठी धडक कारवाई हाती घेतली होती, त्याची माहिती दिलबागसिंग यांनी दिली. पाच दिवसात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला याचा देखील समावेश आहे. सैफुल्लाचा तीन दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता. एका हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले होते.
आत्मसमर्पण केलेला दहशतवादी डोडा येथील रहिवासी असून, त्याची चौकशी सुरू आहे,असेही दिलबाग सिंग यांनी सांगितले. वर्षभरातील मोहिमांचीही माहिती सिंग यांनी दिली. ते म्हणाले की,’या वर्षात आतापर्यंत ७५ यशस्वी मोहिमा राबवल्या गेल्या, ज्यामध्ये १८० दहशतवाद्यांचा खात्मा झाला. स्वतंत्रपणे, १३८ दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. यावर्षी जवानांनी राबवलेल्या यशस्वी मोहिमांनी एक विक्रम प्रस्थापित केला आहे.’
श्रीपुर येथे एटीएम असून अडचण नसून खोळंबा