27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयउत्तराखंडात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून १० ठार, ३७ गंभीर जखमी

उत्तराखंडात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून १० ठार, ३७ गंभीर जखमी

एकमत ऑनलाईन

किच्छा : उत्तराखंडमध्ये रविवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. किच्छाजवळ भाविकांनी भरलेली ट्रॉली उलटून १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातात ३७ जण जखमी झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

या घटनेची माहिती उधमसिंह नगर जिल्ह्यात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. डोळ्यांसमोर आपल्या प्रियजनांचे मृतदेह पाहून नातेवाईकांना रडू कोसळले. पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे. बसगर गावातील सुमारे ४५ ते ५० भाविक उत्तम नगर येथील गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी जात होते. उत्तम नगर गुरुद्वारामध्ये दर रविवारी गुरु ग्रंथसाहिबचे पठण आणि लंगरचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी भाविक बाहेर पडले होते. सिरसा चौकी बरेली जिल्ह्यातील बहेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. पोस्टाजवळ ट्रॅक्टर ट्रॉली आल्यानंतर मागून येणा-या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रॉली उलटून अपघात झाला.

रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातातील जखमी लोक मदतीसाठी याचना करत होते. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. त्याचवेळी बरेली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त पाठवण्यात आला होता. जखमींना उपचारासाठी विविध रुग्णालयात पाठविण्यात आले असून अनेक जखमींना किच्छा येथील सीएचसीमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या