24 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeराष्ट्रीयचेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० कोटीचे हेरॉईन जप्त

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० कोटीचे हेरॉईन जप्त

एकमत ऑनलाईन

चेन्नई : चेन्नईतील अण्णा आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सीमा शुल्क विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १५.६ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. सीमा शुल्क विभागाने जप्त केलेले हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल १०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहेत़ या प्रकरणात दोन विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेजण तंजानियाचे नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. त्यातील एक महिला आणि एक पुरुष आहे.

सीमा शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेजण कतार एअरवेजच्या विमानाने जोहान्सबर्ग आणि दोहा मार्गे चेन्नई इथे दाखल झाले होते. अटक केलेल्या आरोपींची नावे डेबोरो एलिया (वय ४६) आणि फेलिक्स ओबाडिया (वय ४५) आहे. चेन्नई विमानतळावरील सीमा शुल्क आयुक्त राजन चौधरी यांनी सांगितले की, ड्रग्सचा व्यापार वाढल्यानंतर सीमा शुल्क अधिकारी प्रत्येक वस्तूवर नजर ठेवून आहेत. आफ्रिकन देशांमधून भारतात ड्रग्सची तस्करी होत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर सर्वजण अलर्टवर होते. संशय येताच दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असताना त्यांनी उडाउडवीची उत्तरे दिली.

ट्रॉली बॅगच्या खाली लपवले हेरॉईन
दोन्ही आरोपी चौकशी अधिकाºयांना चकवा देत पसार होण्याच्या विचारात होते. मात्र अधिकाºयांच्या सतर्कतेने त्यांचा मनसुबा पूर्ण होऊ शकला नाही. अधिकाºयांना संशय आल्यावर त्यांनी या दोघांकडील सामानाची चौकशी केली. हे दोघे प्रत्येकी २ ट्रॉली बॅग घेऊन आले होते. बॅगच्या पृष्ठभाग प्लास्टिकने पॅक करण्यात आला होता. एका ट्रॉली बॅगमध्ये पाच प्लास्टिकचे पॅकेट ठेवण्यात आले होते, त्यात पावडर होती. जेव्हा या पावडरबाबत चौकशी केली तेव्हा ते हेरॉईन असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत १०० कोटी रुपये आहे. एनडीपीएस कायद्यानुसार या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे

तिस-या लाटेचा धसका!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या