चंदिगढ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि कॉलेजेस बंद असली तरी झालेल्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा समावेश होता.
मात्र हरियाणा बोर्डाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालानंतर एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथील सुप्रिया नावाच्या एका दिव्यांग विद्यार्थनीला दहावीच्या निकालात गणित विषयात केवळ दोन गुण मिळाले. मात्र तिने पेपर रिचेकिंगला टाकल्यानंतर तिचे गुण थेट ९८ ने वाढले आणि तिला पैकीच्या पैकी गुण मिळाले.
सुप्रिया नावाच्या विद्यार्थीनीला हरियाणा बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनने घेतलेल्या १० वीच्या परिक्षेमध्ये गणित विषयात केवळ दोन गुण मिळाले. १० जून रोजी हरियाणा बोर्डाचा दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. सुप्रिया ही अंध असल्याने तिने दिव्यांग विद्यार्थीनी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांचे पेपर तपासणीप्रमाणे तिचे पेपर तपासले गेले नाहीत. त्यामुळेच तिने रिचेकिंगसाठी अर्ज केला. रिचेकिंगमध्ये गणित विषयाचे तिचे गुण थेट २ वरुन १०० झाले.
शहरांचा विळखा सैल, ग्रामीण भागात उद्रेक !