24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयदेशात डिसेंबरमध्ये १० कोटी लस तयार

देशात डिसेंबरमध्ये १० कोटी लस तयार

एकमत ऑनलाईन

पुणे : देशात पुढच्या महिन्यापर्यंत कोरोनाचे १० कोटी डोस तयार होण्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ) अदार पुनावाला यांनी शनिवार दि़ १४ नोव्हेंबर रोजी येथे दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या मदतीने कोरोना लसीची निर्मिती करत आहे. एस्टेजेनका या कंपनीच्या सहयोगाने लसनिर्मितीचे काम सुरू आहे.

जगभरात कोरोनाचे थैमान अजूनही सुरूच आहे. युरोपातील काही देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची आणि कोरोनामुळे होणाºया मृत्यूची संख्या वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रभावी आणि सुरक्षित लसीची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत रशिया आणि चीनमध्ये कोरोनाची लस देण्यास सुरूवात झाली आहे. कोरोना लसीबाबत सीरम इन्स्टिट्यूटनेही दिलासा देणारी बातमी दिली आहे.

भारतीयांनंतरच दक्षिण आशियात पुरवठा
या लसीचे सुरूवातीच्या टप्प्यातील उत्पादन भारतीयांसाठी करण्यात येणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला लसीला मंजुरी मिळाल्यावर देशभरात लस वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. हिंदुस्थानात पहिल्या टप्प्यातील लसीचे वितरण झाल्यावर दक्षिण आशियातील इतर देशांना लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे.

५० कोटी डोस भारतासाठी राखीव
कोरोनाचा प्रकोप वाढत असताना पुनावाला यांनी दिलेल्या माहितीमुळे दिलासा मिळाला आहे. पुढच्या महिन्यात १० कोटी डोस तयार झाल्यास जानेवरीमध्ये मंजुरी मिळून लसीचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूट कोरोनाचे १०० कोटींपक्षा जास्त डोसची निर्मिती करणार आहे. त्यातील ५० कोटी डोस हिंदुस्थानात देण्यात येणार असून उर्वरीत ५० कोटी दक्षिण आशियातील इतर देशांना देण्यात येणार आहेत.

मृत्यू देह घेऊन निघालेल्या ॲम्बुलन्स ला मोहोळनजीक मोठा अपघात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या