26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयगॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात

गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकीकडे रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीची किंमत वाढत आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत असतानाच गणेशाच्या आगमनानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. एलपीजी गॅसचे प्रति सिलिंडर दर १०० रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र ही कपात केवळ व्यवसायिक गॅस सिलिंडरच्याच दरात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलो गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत.

व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास १०० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तर नव्या दरानुसार आता राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅसचा दर प्रति सिलिंडर १८८५ एवढा झाला आहे. तो पूर्वी १९७६.५० रुपये इतका होता. कोलकतामध्ये कपातीनंतर गॅस सिलिंडरचे दर १९९५.५ इतके झाले आहेत. पूर्वी ते २०९५ रुपये इतके होते. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये नव्या दरानुसार एका व्यवसायिक गॅस सिलिंडरसाठी आता १८४४ रुपये मोजावे लागणार आहेत.

व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात होण्याचा हा सलग दुसरा महिना आहे. याआधी ऑगस्टमध्ये देखील एलपीजी गॅसच्या दरात ३६ रुपयांची कपात करण्यात आली होती. तर आज पुन्हा एकदा व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर १०० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या