23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटी

नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: स्टार्टअपला प्रारंभिक भांडवल देण्यासाठी पंतप्रधानांनी एक हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप सीड फंड तयार करण्याची घोषणा केली. तरुणांवर लक्ष केंद्रीत करून भारत एक स्टार्टअप सिस्टम तयार करत आहे. नवीन दशकात आम्ही सर्व स्टार्टअपला एक नवीन ओळख देऊ आणि संपूर्ण जगाला बिम्सटेकच्या सामर्थ्याची जाणीव करून देऊ, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्स्ािंगद्वारे प्रारंभ: स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिटला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने ही समिट आयोजित केली होती. दोन दिवसीय कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी रविवारी पंतप्रधानांनी मल्टी-सेक्टोरल टेक्निकल अँड इकोनॉमिक कॉर्पोरेशन (बिम्सटेक) च्या बे आॅफ बंगाल इनिशिएटिव्हच्या तरुण शोधकांशी संवाद साधला. बिम्सटेक देशांमध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड यांचा समावेश आहे.

स्टार्टअपमध्ये भविष्य बदलण्याची शक्ती
एक स्टार्टअप उपग्रह प्रक्षेपण बद्दल बोलत होता. भविष्य बदलण्याचे सामर्थ्य स्टार्टअपमध्ये आहे, याची जाणीव आपल्या बोलण्यातून दिसून येते. आधीपासूनच स्टार्टअपमध्ये असलेल्या तरुणांची कामगिरी कोैतुकास्पद आहे, असेही मोदी म्हणाले.

लसीकरण सुरू होताच सायबर चोर सक्रिय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या