23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeराष्ट्रीयकोविशील्डचे १० हजार डोस गायब

कोविशील्डचे १० हजार डोस गायब

एकमत ऑनलाईन

जबलपूर : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा १ लाखाच्या खाली आला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिस-या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याचे काम सुरू आहे. मात्र लसींचा तुटवडा असल्याने अनेक राज्यांमध्ये लसीकरणाला ब्रेक लागत आहे. त्यातच मध्य प्रदेशात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील मॅक्स हेल्थ केयर रुग्णालयाच्या नावाने कोविशील्डचे १० हजार डोस खरेदी करण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे डोस कुठे गेले याची माहिती कोणाकडेही नाही. जबलपूरमध्ये अशा नावाचे कोणतेही रुग्णालय नसल्याचे जिल्हा लसीकरण अधिका-यांनी सांगितले. दोन दिवस रुग्णालयाचा शोध सुरू होता. मात्र अशा नावाचे कोणतेही रुग्णालय आढळून आले नाही. त्यामुळे कोविशील्डच्या लसी कोणी खरेदी केल्या आणि त्या आता कुठे आहेत, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

पश्चिम बंगाल भाजपमध्ये खदखद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या