रांची : झारखंडमधील खुंटी येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारे १०५ जोडपे आज वैवाहिक बंधनात अडकले. गरीबीमुळे या जोडप्यांची लग्न करण्याची आणि लोकांना भोजन देण्याची परिस्थिती नव्हती. समाजात ढुकू म्हणून या लोकांचा तिरस्कार केला जातो. मात्र, आता हे जोडपे विवाहाच्या बंधनात अडकल्याने त्यांना सामाजिक न्याय मिळाला आहे. राज्यपाल द्रोपदी मुर्मू आणि केंद्रीय सचिव एऩ एऩ सिन्हा यांनी या जोडप्यांना आशीर्वाद दिले. या लग्न सोहळ्याला डीसी आणि एसपींसह सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सरना पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.
सरकारी सुविधांपासून वंचित लिव्ह इनमध्ये राहणाºया दोघांनाच नाही, तर त्यांच्या येणाºया पिढ्यांनाही समाज्याच्या तिरस्काराचा सामना करावा लागतो. तसेच सरकारी योजना, जसे विधवा पेन्शन, आधार कार्ड, राशन कार्ड तयार करण्यातही या समाजातील लोकांना प्रचंड त्रास होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून संबंधित संस्थेने यांचे आयुष्य अधिक चांगले करण्यासाठी त्यांच्या सामूहिक विवाहाचे आयोजन केले. यावेळी राज्यपालांनी स्वत:च, या लोकांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे.
१०५ जोडप्यांनी घेतले सात फेरे
एका संस्थेने या जोडप्यांना सामाजिक मान्यता देण्याचा विडा उचलला होता. आता यासंस्थेने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाºया या जोडप्यांना लग्नाच्या बंधनापर्यंत पोहोचवले आहे. संबंधित संस्था २०१७ पासून यासाठी प्रयत्न करत होती.
विवाहात स्वत:च्या मुलांचाही समावेश
या बहिस्कृत केलेल्या समाजाचा आज सामूहिक विवाह सोहळा साजरा करण्यात आला़ या सोहळ्याला या १०५ जोडप्यांची चिमुकली मुले आणि काही मुलांची मुलेही उपस्थित असल्याने स्वत:च्याच पालकांचा विवाह होताना पाहताना अनोखा सोहळा मुलांनीही अनुभवला़
आर्थिक स्थिती नसल्याने लग्न नाही
येथील लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. हे लोक लग्न आणि लग्नाचे भोजनही देऊ शकत नाहीत. यामुळे या लोकांवर लिव्ह इनमध्ये राहण्याची वेळ येते. यामुळे या लोकांना ढुकू म्हणून संबोधले जाते. सामाजिक कार्यक्रमांत भाग घेण्याचा त्यांचा अधिकारही काढून घेतला जातो. तसेच या लोकांना नेहमीच टोमणे ऐकावे लागतात.
जीएसटी परतावा भरण्यासाठी मुदतवाढ; ३१ मार्चपर्यंत भरता येणार परतावा