17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeराष्ट्रीयट्रकच्या भीषण अपघातात ११ ठार

ट्रकच्या भीषण अपघातात ११ ठार

एकमत ऑनलाईन

बडौदा : गुजरातमधील बडोदा येथील वाघोडिया क्रासिंग हायवेवर बुधवार दि़ १८ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात घडला. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत.

अपघातामधील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे. पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या दुर्घटनेबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

त्यांनी ट्विट करून म्हटले की, बडोदा जवळ रस्ते अपघातामुळे मृत्यू झाल्याचे ऐकून दु:ख होत आहे. प्रशासकीय अधिका-यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जी लोकं जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत. तसेच, मृत्यू झालेल्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो.

तर, गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील कोठारिया गावाजवळ आज सकाळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण ढळल्याने, चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचेही समोर आले आहे.

दिल्लीत लॉकडाऊनची परवानगी द्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या