20.1 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeराष्ट्रीयकंझावाला हत्याकांडप्रकरणी ११ पोलिस निलंबित

कंझावाला हत्याकांडप्रकरणी ११ पोलिस निलंबित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्लीः दिल्लीतल्या कंझावला केसमध्ये एका तरुणीला कारखाली १३ किलोमीटर फरफटत नेलं होतं. तिच्या शरीरावरील संपूर्ण कपडे निघाले होते, मांसदेखील खरवडून निघालं होतं. या प्रकरणात केंद्र सरकारने लक्ष घातल्यानंतर ११ पोलिस निलंबित झालेले आहेत.

निलंबित करण्यात आलेले पोलिस कर्मचारी रोहिणी जिल्ह्यातले आहेत. यामध्ये दोन पोलिस सब इन्स्पेक्टर निलंबित झालेले आहेत तर चार असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि पाच कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आलेले आहेत.

घटना घडली त्या दिवशी सहा पीसीआर ड्युटीवर होते. निलंबित पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. ज्या रस्त्याने अंजलीला फरफटत नेलं त्या रस्त्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहेत.

काय आहे प्रकरण?
दिल्लीच्या कंझावालामध्ये १ जानेवारीच्या पहाटे एका तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला होता. शरीराचे बरेचसे भाग फरफटत नेल्यानं तुटले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार ५ तरुण भरधाव वेगानं कार चालवत होते. त्यांनी संबंधित तरुणी स्कूटरवरुन जात असताना तिला धडक दिली. त्यानंतर तिला १३ किमीपर्यंत फरफटत नेलं. ज्यात तिचा मृत्यू झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या