नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. या गदारोळामुळे मंगळवार दि. २६ जुलै रोजी राज्यसभेतील ११ खासदारांना आठवडाभरासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी सोमवारी (ता. २५ जुलै) काँग्रेसच्या चार खासदारांना निलंबित करण्यात आले होते.
राज्यसभा खासदारांना सभागृहाच्या वेलमध्ये घुसून घोषणाबाजी केल्याने आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यसभेत गदारोळ केल्याप्रकरणी विरोधी खासदारांवर कारवाई करण्यात आली. उपसभापतींनी तृणमूलच्या खासदार सुष्मिता देव, डॉ. शांतनु सेन आणि डोला सेन, शांता छेत्री, मोहम्मद अब्दुल्ला, ए. ए. रहीम, एल. यादव आणि व्ही. शिवदासन, अबीर रंजन बिस्वास, नदीमुल हक यांना निलंबित केले.