24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयगुगलकडून ऑक्सिजन प्लांटसाठी ११३ कोटींचे अनुदान

गुगलकडून ऑक्सिजन प्लांटसाठी ११३ कोटींचे अनुदान

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगातील विख्यात आयटी कंपनी गुगल आता कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये पुढे सरसावली आहे. गुगलने गुरुवार दि़ १७ जून रोजी म्हटले की, की, त्यांची लोककल्याणकारी संस्था गूगल वेगवेगळ्या संस्थांसोबत एकत्र येत देशात ८० ऑक्सिजन जनरेशन प्लांट्सची खरेदी तसेच स्थापना करणार आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये आरोग्य कर्मचा-यांच्या कौशल्य विकासामध्ये मदतीसाठीही गूगल ११३ कोटी रुपयांचे (१.५५ कोटी डॉलर) अनुदान देणार आहे.

गूगलने या घोषणेअंतर्गत ८० ऑक्सिजन जनरेशन प्लांट्सच्या स्थापनेसाठी गिव्ह इंडियाला जवळपास ९० कोटी रुपये आणि पाथला जवळपास १८.५ कोटी रुपये देणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी अपोलो मेडस्कील्सच्या माध्यमातून कोरोनाला अटकाव घालण्यासाठी २० हजार आरोग्य कर्मचा-यांना प्रशिक्षित केले जाईल.

यासाठी गूगल भारतातील १५ राज्यांमध्ये १८०,००० आशा कार्यक्रत्यांना आणि ४०,००० एएनएमच्या कौशल्य विकासासाठी ३.६ कोटी रुपये (पाच लाख अमेरिकन डॉलर) अनुदान अरमानला देणार आहे. अरमान या अनुदानाचा वापर आशा आणि एएनएमला अधिक सहाय्य देण्यासाठी कॉल सेंटरची स्थापना देखील केली जाईल. गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी म्हटले आहे की, गुगलमध्ये आम्ही या बाबीवर नेहमीच लक्ष दिले आहे की, लोकांकडे सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि उपकरणे असावित.

मुकूल रॉय यांची झेड सुरक्षा काढली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या