22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीयदेशात कोरोनाचे ११,७९३ नवे रुग्ण

देशात कोरोनाचे ११,७९३ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ११,७९३ नवीन रुग्ण आढळले असून, कोविडमुळे २७ जणांचा मृत्यू झालाय. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९६,७०० आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, दैनंदिन सकारात्मकता दर २.४९% आहे.

साप्ताहिक सकारात्मकता दर ३.३६% होता. गेल्या २४ तासांत ४,७३,७१७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १९७.३१ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९६,७०० आहे.

सध्या सक्रिय प्रकरणे ०.२२% आहेत. तर, बरे होण्याचे प्रमाण ९८.५७ टक्के आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९,४८६ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे होण्याचा आकडा ४,२७,९७,०९२ वर पोहोचलाय. आतापर्यंत देशात एकूण ८६.१४ कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या