श्रीनगर : जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या टार्गेट किलिंगनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑलआउट अधिक तीव्र केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षात आतापर्यंत ११८ दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये ३२ विदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे.
या वर्षात आतापर्यंत काश्मीर खो-यात ३२ परदेशींसह ११८ दहशतवादी मारले गेले आहेत. यातील ७७ दहशतवादी लष्करचे आणि २६ दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे आहेत.