गुवाहाटी : आसाम पोलिसांनी बांगलादेशस्थित अन्सारुल इस्लाम या दहशतवादी संघटनेशी संबंधित १२ जिहादींना अटक केली आहे. एक दिवसापूर्वी आसाम पोलिसांनी स्लिपर सेलचा भंडाफोड केला होता.
तो बांगलादेशी दहशतवाद्याला घरात आश्रय देत होता. पोलिसांनी अनेक ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ऑपरेशन अजूनही सुरू आहे. अन्सारुल इस्लाम या दहशतवादी संघटनेची मुळे अनेक देशांत आहेत.