21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीय१३०० भारतीय सिमकार्डची चीनमध्ये तस्करी

१३०० भारतीय सिमकार्डची चीनमध्ये तस्करी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भारत-बांगलादेश बॉर्डर अवैध पद्धतीने पार करण्याचा प्रयत्न करीत असताना एका चीनच्या नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, आपल्या साथीदारांसोबत मिळून तब्बल १३०० भारतीय सिम कार्ड चीनला घेऊन गेला आहे. सीमा सुरक्षा दलाने गुरुवारी चीनच्या हुबेई प्रांतातील निवासी हान जुनवे (३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान आता जुनवे याने आणखी एक मोठा खुलासा केला आहे. सिम कार्डची तस्करी करण्याव्यतिरिक्त जुनवे याने भारतात आणखी एक मोठा गैर व्यवसायाचे जाळे पसरून ठेवले होते़ हान जुनवे यांच्याशी संबंधित आणखी मोठंमोठे धक्कादायक खुलासे उघड होत आहेत.

गुप्त माहिती चीनला पाठवायचा
हान जुनवे व्यवसायाच्या कारणानं भारतात यायचा आणि भारतातून गुप्त माहिती चीनला पाठवायचा. जुनवे याने गुरुग्राममधील भागात स्टार स्प्रिंग नावाचे हॉटेल सुरु केले होते. या हॉटेलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ज्यात रेस्टारंटपासून स्पा सेंटरमध्ये सर्व सुविधांची सोय करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये ८० खोल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, जवळपास ५ ते ६ वर्षांपासून गुरुग्राममध्ये राहार हान सुरुवातीला डीएलएफ फेज ३ मध्ये एक ३० खोल्याचे पीजी चालवायचा.

बीएसएफसाठी मोठे यश
जुनवे आपल्या साथीदारांच्या मदतीने अंडरगारमेंटमध्ये सिम कार्ड लपवत होता. हे सिम चीनमध्ये पाठवले जात होते. सिमच्या मदतीने लोकांना फसवणे, पैसे उकळणे हा हेतू होता. या मोठ्या गुन्हेगाराची अटक बीएसएफसाठी मोठे यश मानले जात आहे. नुकताच लखनौच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आपला व्यवसाय भागीदार सन जिआंग याला अटक केली आहे. त्यानंतर त्याला भारतीय व्हिसा मिळू शकला नाही. तो भारत-बांगलादेश सीमेवरुन आपल्या देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता.

भेटीगाठी व राजकीय समिकरणांची चर्चा !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या