22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयसमुद्राच्या पोटात सापडला १३०० वर्ष जुना खजिना

समुद्राच्या पोटात सापडला १३०० वर्ष जुना खजिना

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : समुद्रातून एका जहाजाचे अवशेष सापडले आहेत. विशेष म्हणजे जहाजाच्या ढिगा-यातून उत्तम प्रकारे जतन केलेली अनेक प्राचीन भांडीही सापडली आहेत. या भांड्यांमधून सुमारे १३०० वर्षे जुन्या वस्तू सापडल्या आहेत. हे जहाज इस्रायलच्या किना-यावर सापडले आहे. शोधकर्त्यांनी म्हटले आहे की, जहाज वेगवेगळ्या भूमध्यसागरीय भागातील मालाने भरलेले होते. सातव्या शतकात इस्लामिक साम्राज्याची स्थापना झाल्यानंतरही या ठिकाणी पाश्चात्य देशांतील लोक व्यापारासाठी येत असत याचा पुरावा हे जहाज आहे. हे जहाज बुडण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सागरी पुरातत्वशास्त्रज्ञ डेबोरा सिविकेल यांनी सांगितले, हे जहाज ७ व्या किंवा ८ व्या शतकातील असेल. धार्मिक विभागणी असूनही तेव्हा या भूमध्यसागरी भागात व्यापार चालू होता, असे पुरावे आहेत. सामान्यत: इतिहासाच्या पुस्तकांमध्ये असे सांगितले जाते की इस्लामिक राजवटीच्या विस्तारानंतर या भागातील व्यापार ठप्प झाला होता. तेव्हा भूमध्यसागरात आंतरराष्ट्रीय व्यापार नव्हता. पण, आता तसे दिसत नाही. आमच्याकडे एका मोठ्या जहाजाचा सांगाडा आहे. आम्हाला वाटते की हे जहाज प्रत्यक्षात २५ मीटर लांब असेल. जहाजाजवळ सापडलेल्या कलाकृतींवरून हे जहाज इजिप्तमधील सायप्रसमधून येथे आले असावे किंवा ते तुर्कीचे असावे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या